Wednesday, 1 October 2014

परभणी : मोदीजी, लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी दिलेला शब्द पाळला

परभणी : मोदीजी, लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी दिलेला शब्द पाळला, आता त्यांना कर्जमुक्त करुन तुम्ही तुमचं वचन पाळा असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींना आवाहन केलं आहे. ते आज परभणीत झालेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर जोरदार तोंडसुख घेतलं. 
 
 
 
मराठवाडा, विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकरी दिलेल्या शब्दानुसार महायुतीमागे उभा राहिला. महाराष्ट्रात 48 पैकी तब्बल 42 खासदार निवडले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. त्यामुळं अशा या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय द्यावं असं आवाहन आपण पंतप्रधान मोदींना करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीची माणूसकी दाखवता, मग आमच्या शेतकऱ्यांसाठी तशीच माणूसकी दाखव असं आवाहन त्यांनी मोदींना केलं.
 
राज्यातल्या भाजप नेत्यांवर टीका :
25 वर्ष जुनी युती हिंदुत्वाचा तत्वावर आधारीत होती. आजही हिंदुस्ताची गरज संपलेली नाही. त्यामुळं अशावेळी शिवसेनेची साथ सोडणं, म्हणजे भाजपची 'गरज सरो वैद्य मरो' अशीच निती असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. कितीही पिढ्या गेल्या तरी, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांच्या मना-मनात आहेत. त्यामुळं शिवसेना एकटी पडल्याचं काहींना वाटत असलं, तरी शिवसेना कधीच एकटी पडू शकत नाही असंही उद्धव म्हणाले.
 
मुंडे-महाजनांचा आठवण येते :
आज गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन गेल्यानं युतीतील दूवा नष्ट झाला. आज या दोन्ही नेत्यांची आठवण येते. गोपीनाथ मुंडे शब्दांचा पक्का नेता होता. पण आज असा नेता भाजपमध्ये उरला नाही अशी खंतही उद्धव यांनी व्यक्त केली.
 
शिवसैनिकच माझी भवानी तलवार :
शिवसेनेचा जन्म हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाला आहे. आजही आम्ही हिंदुत्वासाठीच लढतो. पण, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही मुस्लिमविरोधी आहोत. मुस्लिम बांधवांशी आमचं भांडण नाही. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा आमचा भाऊ आहे. पण, जर कोणी ओवेसींसारखा विष वळवळणारा असेल, तर त्याची मस्ती शिवसेना नक्कीच उतरवले असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.
 
शिवसेनेवर प्रेम करणारा शिवसैनिक हीच माझी भवानी तलवार आहे. त्यामुळं शिवसेनेविरोधात लढताना ही भवानी तलवार माझं बळ आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. शिवसेनेची लाट नाकारणाऱ्या अशा सभा पाहिल्या, तर त्यांना खरं चित्र कळेल असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला.
 
 
उद्धव यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
शिवसेना पक्ष वाढला नाही का?, शिवसैनिकांनी भाजपचा प्रचार केलाच ना
 
मुंडे, महाजन गेल्यानं युतीतला दूवाच नष्ट झाला
 
मुंडे-महाजनांनी वाद तुटेपर्यंत ताणले नाहीत
 
गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांची आठवण येते
 
ओवेसी सारखा विष वळवळणारा असेल तर, त्याची मस्ती उतरवू
 
मुस्लिम बांधवांशी आमचं भांडण नाही, जो देशाला आपलं मानतो, तो आमचा भाऊ
 
भाजप-सेना युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली होती, आजही हिंदुत्वाची गरज
 
25 वर्षांची युती हिंदुत्वावर झाली होती
 
छत्रपतींचा आशिर्वाद मागणाऱ्या भाजपने कधी शिवजयंती केली आहे का?
 
शिवछत्रपतींचं नाव घेणाऱ्या भाजपवाल्यांनी कधी शिवजयंती तरी साजरी केली का?
 
गरज भागल्यानंतर भाजपने सेनेला सोडून दिलं, गरज सरो, वैद्य मरो ही भाजपची नीती
 
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत चालला, पण भाजपवाल्यांनी हिंदुत्वाला दगा दिला
 
काश्मीरमधील पूरग्रस्तांना दाखवलेली माणूसकी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीही दाखवा, मोदींना आवाहन
 
मोदीजी, शेतकऱ्यांनी त्यांचा शब्द पाळला, आता पीककर्ज माफ करुन तुम्ही शब्द पाळा
 
शिवसेना एकटी पडलेली नाही, शिवसैनिक शिवसेनेसोबत
 
गोपीनाथ मुंडे हे शब्दाचे पक्के नेते होते
 
शिवसैनिक हिच माझी भवानी तलवार
 
कितीही पिढ्या आल्या तर शिवसेना, शिवसेनाप्रमुख मनातून जाऊ शकत नाही
 
युतीच्या 25 वर्षे बंधनातून मुक्त होऊन आता बोलत आहे
 
पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अनुभव असून काय उपयोग?

No comments:

Post a Comment