पंतप्रधान मोदी यांच्या झंजावाती वक्तृत्वाचा पहिला टप्पा संपल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय नेत्यांचा आता हल्लबोल सुरु झाला आहे . लक्ष अर्थातच मोदिसाहेब आहेत . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत - पाक सीमेवर चालू असलेल्या गोळीबाराचा अचूक आधार घेत " तिकडे सीमेवर पाकिस्तान कडून हल्ले चालू आहेत आणि पंतप्रधान मात्र महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचारात गुंतले आहेत ", असे सांगत पंतप्रधान आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकात प्रचार करताना दिसले तरी आश्चर्य वाटायला नको अशी खिल्ली उडवली आहे. युती -आघाडी (शिवसेना-बीजेपी आणि कॉंग-राष्ट्रवादी ) भंग एकाच वेळी अगदी सुनोयीजीत असून पुढे शरद पवार मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिसले तरी आश्चर्य वाटायला नको असे सूचक विधान केले आहे. देशाचे पंतप्रधान अमेरिकेत गेल्या नंतर बराक ओबामा त्यांचे स्वागत केम छे असे गुजरातीत करतात म्हणजेच भारतीय म्हणून पेक्षा गुजराती म्हणूनच त्यांचे स्वागत झाले असा ओढूनताणून जावई शोध लावला आहे. अजित पवार यांच्या लेटेस्ट राष्ट्रवादीच्या जाहिरातीची खिल्ली उडवताना ते म्हणतात कि अजितदादा यांनी खरे तर मी करतो , मी बोलतो या पेक्षा मी हडप करतो ,मी गिळतो , मी लुटतो असे बोलले पाहिजे . बीजेपी ने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस चीच भ्रष्ट मंडळी पुन्हा बीजेपीच्या तिकिटावर निवडणुकात उतरवली आहे म्हणजेच राज्य पुन्हा त्यांच्याच ताब्यात असणार . मला सत्ता द्या मी टोल चा झोल बंद करतो असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment