मुंबई : 25 वर्षाचा संसार मोडला, भाजपसह छोटे मित्रपक्षही सोडून गेले आहेत. रिपाइंदेखील भाजपच्याच वाटेवर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकटी पडल्याचं चित्र आहे.
शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर मित्रपक्षांना स्वत: घेण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी भाजपची कास धरली आहे. तर भाजपने रिपाइंलाही मंत्रिपदाचं गाजर दाखवलं आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना रामदास आठवलेंनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.
भाजपने काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत युती तोडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मित्रपक्षांपैकी कोण शिवसेनेसोबत राहणार याबाबत चर्चा रंगली होती. पण रासप आणि शिवसंग्रामने आधीच भाजपच्या साथ देणार असल्याचं जाहीर केलं. तर स्वाभिमानीने 18 जागा मिळण्यावर सहमती झाल्यानंतर भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. तसंच रिपाइंनेही भाजपसोबत जाण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेना आता एकटी पडल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसून येतं आहे.
No comments:
Post a Comment