Friday, 26 September 2014

भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

दोन दशकानंतर एक पक्षाला बहुमत देण्याची संधी - राजीव प्रताप रुडी

130 जागांपेक्षा खाली येणं शक्य नव्हतं - राजीव प्रताप रुडी

युती टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला - राजीव प्रताप रुडी

भाजप महायुतीला संपूर्ण बहुमत मिळेल- देवेंद्र फडणवीस

आठवले यांच्या मंत्रिपदाच्या मागणीबाबत चर्चा सुरू- देवेंद्र फडणवीस

भाजपची राष्ट्रवादीशी युती नाही..नाही..नाही- देवेंद्र फडणवीस

विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढवणार- देवेंद्र फडणवीस

मनिषा चौधरींना विनोद घोसाळकरांविरोधात उमेदवारी जाहीर

शिवसेना आमदार विनोद घोसाळकरांविरोधात तक्रार करणाऱ्या भाजप नगरसेविका मनिषा चौधरी यांना उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्याने सरकार अल्पमतात

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भाजप नेते एकनाथ खडसे राज्यपालांची भेट घेणार

18 मतदारसंघात जागा ठरल्या 2 जागांवर चर्चा सुरू

स्वाभिमानी 18 जागांवर लढणार

राजू शेट्टी यांना भाजपतर्फे 18 जागा जाहीर

भाजपकडून युती तोडल्याबाबत उद्धव ठाकरे जाहीर सभेत बोलणार

उद्धव ठाकरे 27 सप्टेंबरच्या सभेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार


शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांशी चर्चा करुनच निर्णय जाहीर करेल- आठवले
--------
युती टिकवण्यासाठी भाजपने काही तडजोड केली नाही- आनंदराव अडसूळ

युती तुटली म्हणून हिम्मत हरली नाही - आनंदराव अडसूळ

भाजपसाठी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद टाळली - आनंदराव अडसूळ

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती- शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा आरोप

शिवसेना खासदार सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता

भाजपमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळतील हा विश्वास - महादेव जानकर

घटना दुर्दैवी आहे, महायुती टिकण्यासाठी खूप प्रयत्न केले - राजू शेट्टी

घटकपक्षांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र बनविणार- खडसे

युती तुटल्यामुळे दु:ख झालं - महादेव जानकर

जे येतील त्यांना सोबत घेऊन ध्येय्य गाठू - देवेंद्र फडणवीस

शिवसेनेवर कुठलीही टीका करणार नाही- देवेंद्र फडणवीस

राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर आणि आठवलेसोंबत महायुतीची चर्चा करु -देवेंद्र फडणवीस

घटपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरणार - देवेंद्र फडणवीस

युती टिकवण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला - देवेंद्र फडणवीस

शिवसेनेची चर्चा मुख्यमंत्रिपदाभोवतीच, जागांबाबतही सेनेने तडजोड केली नाही - देवेंद्र फडणवीस

घटकपक्षांना अपमानित करण्याचा आमचा हेतू नव्हता - देवेंद्र फडणवीस

भाजपचं समाधान न होऊ शकणारे फॉर्म्युले शिवसेनेनं दिले - खडसे

बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेच्या पुढाकारानं युती अस्तित्वात आली- खडसे

एकनाथ खडेस, फडणवीस, पंकजा मुंडे, तावडे आणि महादेव जानकर यांची उपस्थिती
भाजपची महत्वपूर्ण पत्रकार परिषद सुरु



-------------------------------------
बैठकीत संजय राऊत आणि रामदास कदम उपस्थित

उद्धव ठाकरेंशी घेणार भेट

रामदास आठवले बैठकीसाठी मातोश्रीवर दाखल

शिवसेना-आरपीआयची थोड्याच वेळात बैठक

शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप नेत्यांची बैठक सुरु

युती तुटल्याचा बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत - दिवाकर रावते

फक्त एका जागेचा प्रश्न, भाजप नेत्यांचा अडेलतट्टूपणा - दिवाकर रावते

भाजपकडून योग्य सन्मान राखला जात नाही - दिवाकर रावते

भाजप आमच्याशी चर्चा न करता निघून गेले, ही गोष्ट खेदजनक -  दिवाकर रावते

चर्चेनंतर युतीचा अंतिम निर्णय घेणार - देवेंद्र फडणवीस

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सेनेच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करणार - देवेंद्र फडणवीस

शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - देवेंद्र फडणवीस

घटकपक्षांना 14 जागा देणार असाल तर त्यापैकी 7 जागा आरपीआयला द्या - आठवले

राज्यभरात 70 ते 75 उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश

रामदास आठवले दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

आरपीआय़च्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश

रिपाइं नेत्यांची बैठक संपली

उद्धव ठाकरे तुळजाभवानी मंदिरात दाखल, शिवसेनेच्या प्रचाराचा आज श्रीगणेशा

परळीमध्ये भाजपतर्फे पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेचे नेते चर्चेसाठी ओम माथूर यांच्या निवासस्थानी दाखल झालेत

शिवसेना 148 जागांवर येण्यासाठी तयार आहे मात्र जागा बदलावरून वाद सुरू झाल्याची चर्चा आहे

बीडची जागा शिवसेनेकडे, तर रिसोडची जागा भाजपकडे

रिसोडच्या जागेवरही 27 तारखेला अर्ज दाखल करणार

रात्रीच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा करण्याचा भाजपचा प्रस्ताव

ओम माथूर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे विधानसभेसाठी आज बीडमधून उमेदवारी अर्ज भरणार

स्वाभिमानी, रासप आणि शिवसंग्राम भाजपसोबत जाणार- मेटे

आम्ही भाजपसोबत राहणार- विनायक मेटे

तीन घटकपक्ष भाजपसोबतच राहणार - रामदास आठवले

दोनपैकी एका मोठ्या पक्षासोबत निवडणूक लढवणार - रामदास आठवले

घटकपक्षांसोबत जाण्यात स्वारस्य नाही- रामदास आठवले

भाजपची मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत स्वतंत्र बैठका

रासपच्या जानकरांसोबत भाजपच्या इतर नेत्यांची बैठक सुरू

मेटेंना भाजपकडे खेचण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक सुरू

विनायक मेटेंच्या भेटीसाठी तावडे आणि फडणवीस दाखल

जागावाटपाच्या मुद्द्यावर मुंबईतील मॅजेस्टीक आमदार निवासात बैठक सुरू

घटकपक्षांचा नाराजीचा सूर, महायुती टिकण्याची आशा धूसर - सदाभाऊ खोत

रासप, शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रच - सदाभाऊ खोत

10 मतदारसंघात स्वाभिमानी उमेदवार अर्ज भरणार - सदाभाऊ खोत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याचे आदेश - सदाभाऊ खोत

महायुतीतून कोण बाहेर पडणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल - सदाभाऊ खोत

घटकपक्षांमध्येही जागावाटपाबाबत नाराजी - सदाभाऊ खोत

महायुती तुटल्यास रिपाइं कोणाच्या बाजूने, रिपाइंच्या नेत्यांची आज सकाळी बैठक

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता कमी

अमित शहांचा दौरा रद्द झाल्याने महायुती जवळपास तुटल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज

भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द, दौरा रद्द होण्याचं कारण अस्पष्ट

भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, रिपाइं नेते रामदास आठवले यांची भेट घेण्याची शक्यता

मित्रपक्षांच्या जागावाटपाबाबत अस्पष्टता असल्याने भाजप नाराज

घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटस्फोट?

शिवसेनेचा फॉर्म्युला भाजपला अमान्य असल्याची माहिती

महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्यावर रामदास आठवले आणि विनायक मेटे नाराज
------------------------------------------------------------
मुंबई : अखेर महायुतीतील घटकपक्षांच्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे. वाढीव जागांची मागणी करणाऱ्या घटकपक्षांनी 14 जागांवर समाधान व्यक्त करत, महायुती अभेद्य ठेवण्याचा निर्णय घेतला. रासपचे महादेव जानकर यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. 

साडेदहा वाजता घटकपक्षांच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली. त्यात घटकपक्षांना 14 जागा देण्याचं शिवसेनेनं मान्य केल्याची माहिती राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.

महायुती अभेद्य राहावी यासाठी घटकपक्षांनी चार जागांचा हट्ट सोडत एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळं शिवसेनेच्या या तोडग्यावर समाधानी असल्याचं जानकर यांनी माध्यमांना सांगितलं. यावरुन घटकपक्षांच्या जागांचा तिढा सुटल्याचं निश्चित झालं आहे.

पण अद्यापही शिवसेना आणि भाजपच्या जागांचा घोळ कायम आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेची एकही जागा कमी होत नाही आहे. तर भाजपच्याच कोट्यातील जागा घटकपक्षांकडे वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळं या नव्या फॉर्म्युल्यावर काय प्रतिक्रिया देतं? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान रात्री पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते भाजप नेत्यांसोबत बैठक घेऊन हा नवा फॉर्म्युला सांगतील. त्यानंतरच महायुतीतील जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. सद्यस्थितीत घटकपक्षांच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी भाजप-सेनेतील जागावाटपाचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाहीच.
------------------


राजू शेट्टी, रामदास आठवले, महादेव जानकर आणि मेटे यांचं 14 जागांवर समाधान

घटकपक्षांना 14 जागा मान्य

महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला
------------
शिवसेना-150, भाजप-125 आणि घटकपक्ष-13 जागांचा नवा फॉर्म्युला

राजू शेट्टी-महादेव जानकर, मेटेंची पुन्हा तडजोडीची तयारी

सेना-भाजपसमोर घटकपक्षांचा नवा फॉर्म्युला

घटकपक्षांकडून महायुती टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न

आम्ही त्याग करायची तयारी दाखवली, आता जो काही निर्णय घ्यायचा तो भाजप-सेनेनं घ्यावा- राजू शेट्टी

एक-दोन जागा कमी करा, पण निर्णय आजच घ्या- राजू शेट्टी

महायुतीचा निर्णय उद्यापर्यंत होईल-एकनाथ खडसे

भाजपची घटकपक्षांसोबतची बैठक संपली

भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार सेना-151, भाजप-127 आणि घटकपक्षांना-10 जागा- सूत्र

भाजपकडून पुन्हा नवा फॉर्म्युला -सूत्र
--------------------
महायुतीचा नवा फॉर्म्युला, शिवसेना 150, भाजप 120 आणि मित्रपक्ष 18

समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती सोडू - राजू शेट्टी

दोन तासात महायुतीचा निर्णय होईल - राजू शेट्टी.

भाजप नेत्यांसोबत घटकपक्षांची सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक - राजू शेट्टी

मित्रपक्षांशिवाय भाजप युतीची कल्पना करु शकत नाही- राजीव प्रताप रुडी

शिवसेनेसोबत चर्चा सुरू- राजीव प्रताप रुडी

मित्रपक्षांसहच महायुती व्हायला हवी - देवेंद्र फडणवीस

घटकपक्षांना योग्य जागा मिळाव्यात, महायुती टिकवण्यासाठी भाजपचे प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

घटकपक्षांना सोडून युती करणं आम्हाला योग्य वाटत नाही -  देवेंद्र फडणवीस

शिवसेना 150 पेक्षा कमी जागा घेण्यास तयार नाही - राजू शेट्टी

मित्रपक्षांची उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा पूर्ण, आता भाजपच्या नेत्यांशी चर्चा

सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन लढणार - देवेंद्र फडणवीस

घटकपक्षांना 18 जागा मिळण्याची शक्यता

महायुती कायम राहाणार असल्याचा महादेव जानकरांचा दावा, मातोश्रीवरील बैठकीनंतर जानकरांना विश्वास

18 जागा दिल्यास नाराजांना पुन्हा महायुतीत आणेण - रामदास आठवले

रिपाइं महायुतीमध्येच राहणार - रामदास आठवले

मित्रपक्ष सोडून गेल्यास उर्वरित जागा आम्हाला द्या - रामदास आठवले

घटक पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'कडे रवाना

मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न, शेट्टी, मेटे, जानकरांसह सेना नेत्यांची बैठक

राज्यातील जनतेची माफी मागतो, तळागाळाचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने महायुतीत सामील झालो - सदाभाऊ खोत

सेना-भाजपने गोड बोलून खंजीर खुपसला - सदाभाऊ खोत

शिवसेना आणि भाजपने घटकपक्षांचा अपमान केला - सदाभाऊ खोत

आज संध्याकाळी तिन्ही पक्षांची संयुक्त यादी जाहीर करणार - सदाभाऊ खोत

विधानसभेत तिन्ही पक्ष एकत्र लढणार - सदाभाऊ खोत

स्वाभिमानी, शिवसंग्राम आणि रासप महायुतीतून बाहेर पडणार, सन्मानजनक जागावाटप न झाल्याने निर्णय

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु, ओम माथूर यांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात

सेनेकडून घटकपक्षांना चर्चेसाठी कोणतेही निमंत्रण नाही,मित्रपक्षांना सोडणार नाही- फडणवीस

ओम माथूर यांच्या निवासस्थानी होणार बैठक

थोड्याच वेळात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

मित्रपक्षांना सोडून जाणार नाही- फडणवीस

शिवसेनेकडून घटकपक्षांना चर्चेसाठी आमंत्रण नाही- फडणवीस

घटकपक्षांच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित

महायुतीच्या घटकपक्षांची बैठक थोड्याच वेळात सुरू

दुपारनंतर अमित शहा मुंबईत

जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत
----
मुंबई : महायुतीच्या जागावाटपात घटकपक्षांना डावललं जात असल्याचं पाहुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी यांनी सेना-भाजपसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. सेना आणि भाजप सर्वच्या सर्व 288 जागा लढवाव्या, पण रामदास आठवले आणि महादेव जानकर यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री बनवावं असा प्रस्ताव संतप्त राजू शेट्टींनी ठेवला आहे.

रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत वांद्र्यातल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महायुतीतील जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरु होतं. यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी घटकपक्षांची केवळ सात जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रस्तावानं संतप्त धालेल्या सर्वच घटकपक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

शिवसेना आणि भाजपच्या या प्रस्तावामुळं संतापलेल्या राजू शेट्टी यांनी शिवसेना-भाजपसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवला आहे. भाजप-सेनेला जास्त जागांची भूक आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढवाव्या, पण मुख्यमंत्रिपद घटक पक्षांच्या नेत्यांना द्यावं अशी मागणीच राजू शेट्टी यांनी युतीकडे केली आहे.
  
सर्व चारही घटकपक्ष आपल्या कोट्यातील सर्व जागांचा त्याग करतो. पण त्याचवेळी फुले-शाहु-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद दलित समाजाच्या रामदास आठवलेंना द्यावं आणि अडीच वर्ष धनगर समाजाच्या महादेव जानकरांना द्यावं असा प्रस्तावच त्यांनी युतीच्या नेत्यांसमोर ठेवला आहे.

युतीच्या वादाचं मूळ कारण मुख्यमंत्रिपद असल्यानं सत्तेसाठी भांडणारे भाजप-सेनेचे नेते हा प्रस्ताव स्वीकारण्याची हिम्मत दाखवतील का? असा सवालच राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. 

त्यामुळं महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सध्या तरी अधिक गुंतागुंतीच्या झाल्याचं चित्र आहे. आता आधीच एकमेकांच्या तंगड्या ओढून थकलेले शिवसेना आणि भाजपचे नेते घटकपक्षांची समजूत कशी काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळं महायुती टिकून राहते की तुटले हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.
------------------

महायुतीच्या जागावाटपावर उद्या पुन्हा बैठक होणार.

महायुतीच्या बैठकीत घटकपक्षांनी तिव्र नाराजी व्यक्त केली- सूत्र

महायुतीतील जागावाटपाचं भिजत घोंगडं कायम

कोणत्याही निर्णयाशिवाय महायुतीची बैठक संपली

सर्व पक्षाचे नेते एकत्र जेवण करतायत- मुनगंटीवार

घटकपक्ष नाराज नाही, नाराज असते तर बैठकीत थांबले नसते - मुनगंटीवार

सर्व घटकपक्षांनी जेवणानंतर पुन्हा चर्चा होणार - मुनगंटीवार

जेवणासाठी बैठक तहकूब - मुनगंटीवार

शिवसेना 151, भाजप 130 तर मित्रपक्ष-7 असा शिवसेनेचा फॉर्म्युला

घटकपक्ष शिवसेनेच्या फॉर्म्युल्यावर नाराज

अनेकदा नेत्यांनी बैठक सोडली -सूत्र

राजू शेट्टी, आठवले, मेटे, जानकर सर्व नेत्यांची नाराजी 

जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर घटकपक्षांची नाराजी -सूत्र

महायुतीच्या बैठकीत अभूतपूर्व तणाव
----------------------------------------
मुंबई- महायुतीमध्ये पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी शिवसेनेवर दबाव टाकत, महायुती तोडण्याचा इशारा दिला आहे. जर मित्रपक्ष महायुतीत राहाणार नसतील, तर भाजपही युतीतून बाहेर पडेल, असा इशारा शिवसेनेला दिला आहे.

महायुतीची महाबैठक आता बांद्र्याच्या सॉफिटेल हॉटेलवर सुरू आहे. या बैठकीत शिवसेनेने नवा फॉर्म्युला सादर केला आहे. यानुसार शिवसेना 151, भाजप 130 तर मित्रपक्षांना अवघ्या सात जागा असा आहे.

हा फॉर्म्युला मित्रपक्षांना मान्य नाही. त्यामुळे मित्रपक्षांना हाताशी घेऊन, भाजप शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे.
यापूर्वी शिवसेनेनं नवा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला होता. त्यानुसार शिवसेनेला 150, भाजपला 124 तर मित्रपक्षांना 14 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र या फॉर्म्युलावरही एकमत न झाल्याने, शिवसेनेने दुसरा फॉर्म्युला ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता त्यावरूनच टोकाचा तणाव निर्माण झाला आहे.


घटकपक्षांच्या मदतीनं भाजपचा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न- सूत्र

भाजपचाही  शिवसेनेला युती तोडण्याचा इशारा- सूत्र

घटकपक्ष महायुतीत नसतील, तर भाजपही युती तोडणार- सूत्र

भाजपचा घटकपक्षांच्या सूरात सूर

घटकपक्षांचा महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा- सूत्र

जागावाटपावरुन घटकपक्ष नाराज

महायुतीच्या बैठकीत तणाव वाढला-सूत्र

बैठकीत शिवसेना-151, भाजप-130 आणि घटकपक्ष-7 जागांचा नवा फॉर्म्युला सादर -सूत्र

महायुतीची महत्वपूर्ण बैठक सुरु

देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि आशीष शेलारही पोहोचले

विनायक मेटे, रिपाइंचे नेते महातेकर, शिवसेनेचे नेते आदी बैठकीच्या ठिकाणी पोहोचले

रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर बैठकीला पोहोचले

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता

घटकपक्षांना युतीचा फॉर्म्युला मान्य होईल?

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल?

शिवसेना नेते दिवाकर रावते, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई पोहोचले

महायुतीची बैठक वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये

थोड्य़ाच वेळात महायुतीच्या बैठकीला सुरुवात होणार
-----------------------
महायुतीतील जागावाटपाबाबत घटकपक्षांसोबतची बैठक उशिरा सुरु होणार

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार बैठक

महायुतीतील जागावाटपाबाबत घटकपक्षांसोबत 5 वाजता बैठक

युती कायम ठेवण्यावर दोन्ही पक्षांचं शिक्कामोर्तब

युती कायम राहणार - संजय राऊत

सर्व प्रस्ताव आणि घटकपक्षांसोबत चर्चा करुन अधिकृत घोषणा करु- सेना-भाजप

शिवसेनेने नवा प्रस्ताव दिला आहे, मित्रपक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ - विनोद तावडे

युती टिकवण्याचा भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न - विनोद तावडे

शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद सुरु

शिवसेना-भाजपमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. भाजप 126 जागा लढणार असल्याची सुत्रांची माहिती

शिवसेना नेते भाजप कार्यालयात दाखल, थोड्य़ाच वेळात बैठकीला सुरूवात

सुभाष देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर बैठकीसाठी रवाना

महायुती टिकणार की तुटणार याची शेवटची बैठक

सेना नेते थोड्याच वेळात भाजप नेत्यांच्या भेटीला

युती टिकवण्यासाठी सेना-भाजप नेत्यांचा शेवटचा प्रयत्न

कोणाकडे जायचे हे सर्व घटकपक्ष मिळून ठरवणार- स्वाभिमानी

युती तुटल्यास आम्ही चार घटकपक्ष एकाच पक्षाकडे जाऊ- स्वाभिमानी

आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले- स्वाभिमानी

युती तुटल्यास रासप, आठवले, शिवसंग्राम भाजपसोबत जाण्याची शक्यता

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुतीबाबत चर्चा होणार नाही- मुनगंटीवार 

महायुती तुटल्यास शिवसेना जबाबदार- भाजप

डबेवाला संघटना अध्यक्ष सुभाष तळेवकर यांची माहिती

मुंबईच्या डबेवाल्यांचा शिवसेनेला पाठिंबा
-------------------------------
मुंबई : महायुतीत सुरु असलेला तिढा जागा वाटपावरून नाही तर मुख्यमंत्रिपदावरून सुरु असल्याचं दिसतं आहे. शिवसेना-भाजपमध्ये असलेल्या तिढ्यात जागा वाटप हे पक्त निमित्त आहे. खरी रस्सीखेच मुख्यमंत्रिपदावरून आहे, असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी सांगितलं आहे.

त्याआधी मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेचंच असेल आणि उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत यांनी माझाच्या कट्ट्यावर स्पष्ट केलं होतं. त्यामुळे महायुतीमध्ये सुरु असलेली रस्सीखेच ही जागा किती हव्यात यावरून नाही तर मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असावा यावरून सुरु असल्याचं स्पष्ट होतं आहे.

त्यामुळं जागावाटपाचं कारण जरी दोन्ही पक्ष पुढे करत असले, तरी खरा तणाव हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं सत्ता येण्याआधीच सुरु झालेला खूर्चीचा हा संघर्ष आणखी किती काळ चालतो हाच खरा प्रश्न आहे. आता शिवसेना-भाजप हा तिढा फाटेपर्यंत ताणला जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
--------


राजीव प्रताप रुडी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी

सेनेला मुख्यमंत्रिपद गमावण्याची भीती- राजीव प्रताप रुडी

 शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर भाजपचा चिमटा

--------------------
शिवसेना-भाजपची युती तुटीच्या मार्गावर

जागावाटपाची चर्चा पूर्णपणे बंद, शिवसेनेशी कोणतीची चर्चा करणार नाही- भाजप

जागावाटपावर तोडगा काढण्याची शिवसेनेची मानसिकता नाही- फडणवीस

जागावाटपाच्या चर्चा माध्यामातून होत नाहीत- देवेंद्र फडणवीस

संजय सावकारे हे राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जळगावचे आमदार

किसन कथोरे हे राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार

राष्ट्रवादीचे नेत संजय सावकारे आणि किसन कथोरे भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्र भाजपची उद्या मुंबईत बैठक, राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार

शिवसेना-भाजप युती टिकणं गरजेचं- अमित शहा

शिवसेनेनं अंतिम प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अमित शहांची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा
--
मुंबई: शिवसेना-भाजपच्या जागावाटपातील तिढा अद्यापही कायम आहे. एकीकडे काल उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर 119 जागांचा प्रस्ताव ठेवला असला तरी भाजपला मात्र तो प्रस्ताव मान्य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

दिल्लीत काल भाजपची संसदीय समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीत भाजपने 130 जागांवर उमेदवार निश्चिती केल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही पक्ष आपआपल्या जागांवर अडल्यानं जागावाटपाची कोंडी वाढली आहे.

भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत 170 जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आहे. तसंच महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यातही वेगळी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावत भाजपनं स्वतंत्र लढण्याची तयारीही सुरु केली आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत सांमजस्याची भूमिका कोण घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.


No comments:

Post a Comment