युती तोडल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा एकत्र राहिल्याने मिळणारा लाभ हा अधिक होता हे कळत होते म्हणून प्रमोदकाका आणि बाळासाहेब आजोबा एकत्र राहिले, हे उघडच आहे. एकत्र कुटुंबातील एखाद्या भावाच्या प्रगतीचा वेग अधिक असल्यास काही कालानंतर त्यास कुटुंबापासून वेगळे व्हावेसे वाटत असेल तर ते जसे समजून घेणे गरजेचे असते तसेच राजकीय पक्षांबाबतही घडत असेल तर त्यात गैर ते काय?
गोडीगुलाबीने वेगळे होणे हे आपल्या संस्कृतीतच नाही. मग हे वेगळे होणे नोकरीतील असो, कुटुंबातील असो किंवा राजकीय. वेगळे व्हायचे ते मी तुझे पुन्हा तोंडही पाहणार नाही या नंतर मोडावयाच्या भीष्मप्रतिमेसह. वेगळे होणे म्हणजे शत्रुत्व पत्करणे असाच वेडगळ समज आपल्या समाजात अजूनही आहे. परंतु वेगळे होणेदेखील आनंददायी असू शकते या प्रौढ जाणिवेपासून आपण कैक योजने दूर असून याचेच प्रतिबिंब राजकारणातही पडलेले दिसते. शिवसेना आणि भाजपचा देवाधर्माच्या आधारे चाललेला २५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सोयीची सोयरीक तुटल्यानंतर याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्र घेत आहे. राज्यातील सांस्कृतिक समजूतदारपणा किती खालच्या यत्तेत आहे, हेच यातून दिसून येते. भाजप-सेना काय किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काय. या चारही पक्षांनी एकमेकांपासून फारकत घेण्यात काहीही गैर नाही. किंबहुना तसा तो घेणे ही त्यांच्या त्यांच्या काळाची गरज होती आणि नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे नसते. तसे केले तर मन मारून जगावे लागते. मग ती व्यक्ती असो वा अनेक व्यक्तींचा बनलेला राजकीय पक्ष. असे मन मारून जगणे हे स्वत:वर अन्याय करणारे असते. असा अन्याय या पक्षांकडून यापुढे होणार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेना यांची युती ही अधिक जुनी. आणि म्हणूनच घटस्फोटासाठी अधिक लायक. हे दोन पक्ष एकत्र आले ते त्या वेळी त्यांची गरज होती म्हणून. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकटय़ा पडलेल्या भाजपला कोणी मिळाला तर साथीदार हवा होता आणि लटके मराठी मराठी करून अडकलेली शिवसेना वाढीसाठी दुसरा काही मुद्दा शोधत होती. तेव्हा गरजू जीव जसे एकमेकांकडे आकृष्ट होतात तसेच हे राजकीय पक्ष नैसर्गिक ओढीने एकमेकांकडे आकर्षित झाले. परस्परांच्या गरजा भागवणे ही किमान गरज या संबंधातून भागवली जाईल अशी खात्री झाल्यानंतर देवाधर्माच्या साक्षीने या दोन्ही पक्षांनी जाहीर केले, आमची युती झाली. तेव्हा मुदलातील मुद्दा हा की ही युती एकमेकांची तात्कालिक गरज आणि भूक भागवणे याच उद्देशाने झालेली होती. तीस तत्त्वाचा आधार होता वगैरे भाषा करणे हा शुद्ध भंपकपणा. तो आपल्याकडील संस्कारांत चपखल बसतो. ज्या वेळी ही युती झाली त्यावेळी हे दोनही पक्ष वयाने आणि आकाराने लहान होते. कोणत्याही जैविक घटकाप्रमाणे काळाच्या ओघात त्यांचा आकार वाढणे नैसर्गिकच. तसा तो वाढल्यावरही त्यांना ते लहानपणी ज्यात मावत होते त्यातच त्यांनी राहावे असे मानणे अशास्त्रीय आहे. परंतु आपल्याकडची गंमत ही की हे असेच अशास्त्रीय असायला हवे असे खुद्द त्या पक्षांतील काहींना आणि जनतेतीलही अनेकांना वाटते. हे समाजात शास्त्रीय विचार न रुजल्याचेच लक्षण. तसा तो नसल्यास व्यक्ती वा व्यक्तींचा समूह असलेले राजकीय पक्ष विचार भावनेच्या आधारे करतात. त्याचमुळे प्रमोदकाका आणि बाळासाहेब आजोबांची आठवण काढली जाते आणि फुकाचे भावनिक कढ काढले जातात.

No comments:
Post a Comment