दोस्त ही ऐसे मिले की दुश्मनों की जरूरत नही.....!
दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत असल्याचे पाहून हेच वाक्य आठवावे लागते. (शिवसेना आणि भाजपमधील भांडणासाठीही हेच वाक्य चालेल.)
अर्थात दोन्ही कॉंग्रेसला तसे वाटत नाही. त्याची काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे एकत्र लढले म्हणजे कॉंग्रेसला राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी प्रतिमेचे आणि राष्ट्रवादीला कॉंग्रेसच्या अकार्यक्षम प्रतिमेचे ओझे वाहावे लागले असते. दोन्ही कॉंग्रेस वेगळ्या लढत असल्याने "अँटी इन्कम्बसी‘चा फॅक्टर "नील‘ होऊन जातो. तिसरे कारण म्हणजे वेगळे लढल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या जागा वाढतात. एकमेकांचे कार्यकर्ते बंडखोरी करत नाहीत. त्यामुळे अपक्षांऐवजी अधिकृत उमेदवार जास्त निवडून येतात. याही पेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे निवडणूकपूर्व सर्व्हेत स्वतंत्र लढल्यास दोन्ही पक्षांच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. पाचवे कारण म्हणजे शिवसेना आणि भाजपचे सरकार येणारच आहे, असा सगळीकडे अंदाज व्यक्त होत असल्याने विरोधातच बसावे लागणार आहे. मग स्वतंत्रपणे लढून हरणारी लढाई जिंकण्यासाठी जुगार तर खेळू या. स्वतंत्र लढल्यानंतर काय होत ते तरी पंधरा वर्षांनंतर बघू , असाही सूर दोन्ही पक्षांत होता.
आघाडी जाणीवपूर्वक तोडली दोन्ही पक्षांच्या अपेक्षांनुसार ही आघाडी तुटली. आघाडी तुटण्याला राष्ट्रवादीची महत्त्वाकांक्षा किंवा कॉंग्रेसचा थंडपणा कारणीभूत होता, असे एकमेकांविषयी हे पक्ष बोलतात. पण दोघांच्याही मनात तसेच होते. तसे नसते तर एकाने तोडण्याची भाषा केल्यानंतर दुसऱ्याने सावरण्याचा प्रयत्न केला असता. सोनिया गांधी आणि शरद पवार या दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी मध्यस्थी करून आघाडी टिकवलीच असती. पण मनातच नव्हते. त्यामुळे जादा जागांसाठी किंवा मुख्यमंत्रिपदासाठी आघाडी तोडली, हे आपले माध्यमांना सांगण्यासाठी ठीक आहे.
दोन्ही पक्ष 1999 ची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आडाखे आखत आहेत. त्या वेळी जसे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले, तसेच या ही वेळी होईल, असे ते मनात मांडे खात आहेत. राष्ट्रवादीला सत्तेसाठी भिडू कोणीही असला तरी चालेल. त्यामुळे उद्या सत्तेसाठी राष्ट्रवादी हा पक्ष भाजप, शिवसेना किंवा कॉंग्रेससोबत गेल्यास आश्चर्य वाटायला नको. कॉंग्रेसला भाजप व शिवसेनेबरोबर काही तत्त्वांमुळे जाता येणार नाही. या जर-तरच्या गोष्टी झाल्या. पण 1999 ची परिस्थिती खरेच येईल का, हा प्रश्न आहे. त्यासाठी 1999 चेच आपण उदाहरण घेऊ.
अँटी इन्कम्बसी कायम राहणार एखाद्या सरकारच्या विरोधात लाट असेल तर काय होते, हे 1999 च्या निवडणुकीने दाखविले. तेव्हा राज्यात भाजप-शिवसेना युतीचे राज्य होते. अण्णा हजारे यांना युती सरकारने तुरुंगात डांबले होते. युती सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा बाहेर येत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काही विधाने वादग्रस्त ठरली होती. झुणका भाकर केंद्रातील भ्रष्टाचाराच्या बातम्या रोज येत होत्या. रमाबाई आंबेडकर नगरातील गोळीबार प्रकरण गाजल्याने दलित समाज नाराज होता. अशी सारी परिस्थिती होती. याच काळात दोन्ही कॉंग्रेस वेगवेगळ्या झाल्या. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एक मताने पडले होते. त्या सरकारबद्दल जनतेत सहानुभूती होती. त्याच वेळी राज्यात असलेल्या नारायण राणे यांच्या सरकारने या संधीचा फायदा घेत मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. दोन्ही कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढत असल्याने भाजप-सेना युतीला सहज विजय मिळेल, असे तेव्हा भाजप व सेनेच्या नेत्यांना वाटले. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कॉंग्रेसने 80 हून अधिक आणि राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या. दोन्ही कॉंग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. सेना आणि भाजपला हात चोळत बसावे लागले. तेव्हा जी सत्ता गेली ती अजून आलेली नाही. त्या शिवसेना-भाजपच्या सरकारसारखी वेळ आताच्या कॉंग्रेसच्या आघाडी सरकारची झाली आहे. एकत्र लढले काय आणि स्वतंत्र लढले काय, मरण हे ठरलेले आहे. फरक फक्त एवढाच की 1999 च्या पराभवानंतर शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्ररीत्या लढून एकहाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात आहेत. 2014 च्या पराभवानंतर दोन्ही कॉंग्रेसची अशी स्थिती राहील काय?
बिहार आणि युपीसारखी स्थिती? बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस 1990 पर्यंत स्वबळावर सरकार स्थापन करत होती. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर 25 वर्षे होऊनही या दोन्ही प्रमुख राज्यांत कॉंग्रेसची स्थिती ही नाजूक आहे. अशी नाजूक स्थिती महाराष्ट्रात दोन्हीपैकी एका कॉंग्रेसची होण्याची शक्यता आहे. दोन्ही कॉंग्रेसला आता असे वाटू लागले आहे की एक कोणती तरी कॉंग्रेस संपल्याशिवाय आपला विस्तार नाही. या दोन्ही कॉंग्रेसचा मतदार एकच आहे. कॉंग्रेसला मुंबईसारख्या शहरात आणि विदर्भात अपील आहे. राष्ट्रवादीला या दोन्ही ठिकाणी फारसे स्थान नाही. हा प्रमुख फरक वगळला तर दोन्ही कॉंग्रेसमध्ये साम्यच आहे. मराठा, ओबीसी, ऊस शेतकरी, आदिवासी, दलित असाच हा मतदारवर्ग आहे. दोन्ही पक्षांचे आपापले सुभेदार असतात. हे सुभेदार जातनिहाय, कारखानानिहाय, शहरनिहाय, गावनिहाय असतात. त्याला आपल्याकडे ओढले की संबंधित वर्गाचा मतदार त्या पक्षाकडे येतो, असा त्या दोघांचाही समज आहे. तो आतापर्यंत खरा ठरत आला आहे.

राष्ट्रवादी संपल्याशिवाय कॉंग्रेसला येथे उज्ज्वल भवितव्य नाही, हे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाणले असावे. त्यामुळे त्यांनी सरकारमध्ये असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गंडस्थळ असलेल्या अजित पवार यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ त्यांनी आणली. दरबारी राजकारणात पृथ्वीराज हे किती मुरलेले होते, यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकात शरद पवार यांच्या विरोधातील बातम्यांचा सोर्स हा पंतप्रधान कार्यालयात होता असे व्यक्त करत चव्हाण यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला आहे. हे काय सांगते? त्यामुळेच राज्य सहकारी बॅंक बरखास्त करणे असो किंवा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची योजना असो यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बऱ्यापैकी बदनाम झाली. या बदनामीचे चटके त्या पक्षाला अजूनही बसत आहेत. चव्हाण यांचा डाव राष्ट्रवादीच्या लक्षात आला असावा. पण केंद्रात आणि राज्यात हा पक्ष सत्तेवर होता. त्यामुळे काहीच करता येत नव्हते. मोदी लाटेत केंद्रातील आघाडी सरकार वाहून गेल्याने राज्यातील सरकारवर पाणी सोडायला राष्ट्रवादी कॉंग्रेस तयार झाली.
जखमा वाहू लागल्या अर्थात राष्ट्रवादीवाले डावपेचात काही कमी नव्हते. त्यांनाही कॉंग्रेस वाढावी, असे कुठे वाटत होते? म्हणूनच मग अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात भरपूर निधी दिला. बहुतांश महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असल्याने कॉंग्रेस आमदारांनी तेथे सांगितलेल्या बदल्याही होत नव्हत्या. मुख्यमंत्री त्यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला बदल्यांच्या प्रकरणात फारसे लक्ष घातले नव्हते. मात्र त्यांच्याही लक्षात यातील राजकारण आल्यानंतर त्यांनीही राष्ट्रवादीची शिफारस असलेले अधिकारी हे कसे नेमले जाणार नाहीत, हे पाहिले. अशा अनेक प्रकरणांत दादा व बाबा यांच्यात चकमकी झडतच होत्या.

लोकसभा निवडणुकीनंतर मात्र हे ओझे असह्य झाल्याने आघाडी तोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राज्यातील 1995 च्या निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि त्यात विलासराव देशमुख, पतंगराव कदम असे नेते पडले. या बंडखोरीमागे शरद पवारांचा हात होता, असे बोलले जात होते. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याचे धाडस राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालविले आहे. पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील ही कॉंग्रेसची बडी मंडळी कशी पडतील, याकडे पक्षाने लक्ष दिले आहे. विदर्भ आणि मुंबई वगळता कॉंग्रेसच्या इतर आमदारांच्या विरोधातही राष्ट्रवादीचे प्रबळ उमेदवार आहेत. पाडापाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढेच असते.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विरोधात मोठा असंतोष असल्याने कॉंग्रेसने तेथे उमेदवार उभा केला तरी तो त्याने घेतलेल्या किमान मतांचाही फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तेथे लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपने मोठी मुसंडी मारली. तेथे राष्ट्रवादी काठावर आहे. त्यात कॉंग्रेसचा उमेदवार उभा असल्याने राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार आहे. कॉंग्रेसकडे कोणी मोठे नेते प्रचारासाठी नाहीत. कॉंग्रेसचे केंद्रीय नेतृत्व सध्या हतबल आहे. सभेला पाच हजार लोक स्वतःहून जमू शकतील, असा एकही नेता प्रदेश कॉंग्रेसमध्ये नाही. राष्ट्रवादीत अजित पवार, आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ यांच्याशिवाय वक्त्यांची यादी पुढे जात नाही. दोन्ही कॉंग्रेसला मतदारांनी लोकसभा निवडणुकीत असा धपाटा दिला आहे की त्याचे वण याही निवडणुकीत जाणवण्याची शक्यता आहे. त्यात एकमेकांच्या विरोधातील लढाईत दोन्ही कॉंग्रेस गुंतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही विशिष्ट बिल्डरांच्या फाइल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्लिअर केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. हे त्याचेच निदर्शक आहे. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांना जखमी करण्यास सुरवात झाली आहे. पुढच्या काही दिवसांत आणखी आरोपांनी ते रक्तबंबाळ होतील.
खरे तर या दोन्ही पक्षांची लढाई शिवसेना आणि भाजपशी आहे. मात्र अनेकदा थेट शत्रुपेक्षा मित्र म्हणून राहिलेल्या व नंतर दुश्मन बनलेल्यांबद्दल जास्त कटुता असते. असल्या शत्रुंबद्दल माहितीही जास्तच असते. या "मित्रा‘ने आपल्याला फसविले असल्याने त्याला धडा शिकविण्याची जास्त उबळ येते. (हेच शिवसेना आणि भाजपबद्दलही लागू आहे.) त्यामुळे या भांडणात दोन्ही कॉंग्रेसचे नुकसान होणार, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. यात एका कॉंग्रेसला जास्त फटका बसेल. तो कोणाला बसेल हे पुढच्या काही दिवसांतील वातावरणात लक्षात येईल. आता कोठे आरोपांना धार लावायला सुरवात झाली आहे. जखमा होऊन रक्त वाहेल तशा माना पडू लागतील.
No comments:
Post a Comment