मुंबई : 25 वर्ष जुनी भाजप-सेना युती आणि 15 वर्ष जुनी सत्ताधारी आघाडीत काडीमोड झाल्यानंतर एबीपी माझा-नील्सन यांनी स्नॅप पोलद्वारे मुंबईकरांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व्हेत मुंबईकरांच्या मनातील पक्ष आणि मनातील मुख्यमंत्री शोधण्याचा प्रयत्न केला गेला.
तसंच युती आणि आघाडीमुळं राजकीय समीकरणं कशी बदलतील याचाही अंदाज या सर्व्हेतून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. अवघ्या एका दिवसात आणि केवळ मुंबईपूरता हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून मुंबईकरांचा कौल काय? हे लक्षात येतं. एकुण सहा प्रश्नातून व्यक्त झालेला आणि मुंबईकरांनी दिलेला हा कौल पुढीलप्रमाणे आहे.
शिवसेना-भाजप युती कुणामुळं तुटली?
भाजप-40 टक्के, शिवसेना- 27 टक्के , दोन्ही पक्षांमुळे-29 टक्के आणि माहित नाही - 4 टक्के
सेना- भाजप युती तुटण्यास मोदी जबाबदार आहेत?
हो - 34 टक्के, नाही - 60 टक्के आणि माहिती नाही - 6 टक्के असा मुंबईकरांचा कौल
युती तुटल्याचा जास्त फटका कुणाला?
भाजप फटका बसेल असं -38 टक्के लोकांना वाटतं, तर शिवसेनेला बसेल असं 33 टक्के लाकांना वाटतं. तर दोघां पक्षांना बसेल अंस 27 टक्के लोकांना वाटतं आहे. तर सांगता येत नाही असं 2 टक्के लोकांना वाटतं.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याचा जास्त फटका कुणाला?
काँग्रेसला बसेल असं 41 टक्के, राष्ट्रवादी- 30 टक्के, दोन्ही पक्षांना बसेल असं 28 टक्के आणि सांगता येत नाही असं एक टक् मुंबईकरांनी सांगितलं.
युती आणि आघाडी तुटल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी पंसती कुणाला?
उद्धव ठाकरे यांना 40 टक्के, पृथ्वीराज चव्हाण- 18 टक्के, देवेंद्र फडणवीस-12 टक्के, राज ठाकरे-7 टक्के , विनोद तावडे- 5 टक्के, अजित पवार-3 टक्के, शरद पवार- 3 टक्के, सुशीलकुमार शिंदे-3 टक्के, नारायण राणे-2 टक्के, अशोक चव्हाण-2 टक्के आणि इतर 2 टक्के असा कौल मुंबईकरांनी दिला. तर सांगता येत नाही असं उत्तर 4 टक्के लोकांनी दिलं.
15 ऑक्टोबरला तुम्ही कोणाला मतदान करणार?
शिवसेनेला मत देऊ असं 38 टक्के मुंबईकर सांगतात. भाजप-34 टक्के, काँग्रेस-16 टक्के, मनसे-5 टक्के, राष्ट्रवादी - 2 टक्के, रिपाइं आठवले गटाला 1 टक्का आणि इतरांना मत देऊ असं एक टक्के मतदार सांगतात. तर तीन टक्के मतदार सांगता येत नाही असं उत्तर देतात.
No comments:
Post a Comment