अमेरिकी उद्योजकांबरोबर चर्चा; विकासाला संधी
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील 11 बलाढ्य कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करीत त्यांच्यापुढे भारताची यशोगाथा मांडली. देशात पायाभूत सुविधा वाढीसाठी, तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी जोरदार प्रयत्न केले. भारताचे आश्वासक चित्र रंगविताना मोदी यांनी भारतात असलेल्या संधींची माहिती या उद्योजकांना दिली. देशात पायाभूत विकासाची मोठी संधी असून, त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व आमच्या नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असे मोदी यांनी या उद्योजकांना सांगितले.
आज सकाळी तासभर झालेल्या या ब्रेकफास्ट चर्चेत "पेप्सिको‘च्या सीईओ इंद्रा नुई, "गुगल‘चे अध्यक्ष इरिक श्चिमिद, "सिटीग्रुप‘चे प्रमुख मायकेल कोर्बाट आदी दिग्गज उद्योजक सहभागी झाले. पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, ""भारत हा खुल्या मनाचा देश आहे. उद्योजकांना पूरक वातावरणनिर्मिती करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. आम्हाला बदल हवा आहे. मात्र बदल हा कधीच एका बाजूने होत नाही. नागरिक, गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी मी या विषयावर सातत्याने चर्चा करीत आहे.‘‘

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबराउद्दीन यांनी पंतप्रधानांच्या भाषणाची माहिती "ट्विट‘द्वारे प्रसिद्धीला दिली आहे.
मोदींनी आज ज्यांच्याशी चर्चा केली त्या कंपन्या अगोदरच भारतात आहेत आणि त्यांचे प्रमुखही भारतात उद्योगविस्तार करण्यास उत्सुक आहेत. या बैठकीला ‘मास्टरकार्ड‘चे सीईओ अजय बंगा, ‘कारगिल‘चे अध्यक्ष आणि सीईओ डेव्हिड डब्ल्यू. मॅकलान, कार्लाईल समूहाचे सहसंस्थापक डेव्हिड एम. रुबेनस्टिन, ‘कॅटरपिलर‘चे डग्लस ओबेरहेल्मन, ‘एईएस‘चे अँड्रेस ग्लुस्की, ‘हॉस्पिरा‘चे मायकेल बॉल आणि ‘वॉरबर्ग पिनकस‘चे चार्ल्स काए आदींची प्रमुख उपस्थिती होती.
एक तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सहा कंपन्यांच्या सीईओंबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यात ‘बोईंग‘, ‘केकेआर‘, ‘ब्लॅकरॉक‘, ‘आयबीएम‘, ‘जनरल इलेक्ट्रिक‘ आणि ‘गोल्डमन सॅशे‘ या कंपन्यांचा समावेश होता. उद्योजकांशी चर्चेचा सिलसिला उद्याही कायम राहणार आहे. मोदी वॉशिंग्टन येथे जाणार असून त्या ठिकाणी होणाऱ्या उद्योजकांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.
कोळसा खाणवाटपाचा निर्णय : एक संधी कोळसा खाणवाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही संधीत रूपांतर करणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, ""या निर्णयामुळे जुन्या वाईट बाबी पुसून टाकण्याची संधी आम्हाला मिळाली असून, आम्ही याकडे भविष्यातील संधी म्हणून पाहात आहोत.‘‘ न्यायालयाने गेल्या आठवड्यात, 1993 पासून विविध कंपन्यांना दिलेल्या 218 कोळसा खाणींपैकी 214 खाणींचे वाटप रद्द केले होते. या निर्णयामुळे उद्योग जगतात चुकीचा संदेश गेल्याची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.
No comments:
Post a Comment